Pune : देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये जावेच लगेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा

गोरगरीब, मध्यमवर्गीयांची लूट करणाऱ्यांची खैर नाही

एमपीसी न्यूज – देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये जावेच लगेल. गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांची पै पै वसूल केल्याशिवाय आपला सेवक स्वस्थ बसणार नाही, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँगेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला. मागील 5 वर्षांत या नेत्यांना मी जेलच्या दरवाजापर्यंत आणले. मुंबईपासून दिल्लीपर्यंत ज्यांनी लूट केली. त्यांना आता जेलमध्ये पाठविणारच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विद्येच्या माहेरनागरीतून तुम्ही आलात, कसे काय पुणेकर म्हणून मोदी यांनी मराठीत बोलून भाषणाला सुरुवात केली. विरोधकांनी 370 कलम 70 वर्षे लटकवून ठेवले होते. आमच्या सरकारने 5 महिन्यांतच हे कलम रद्द केले. एक देश, एक संविधान असा नारा देताच उपस्थित नागरिकांनी टाळयांचा कडकडाट केला. त्यावेळी मोदी यांनी भाषण सोडून नागरिकांना वाकून अभिवादन केले. यावेळी मोदी मोदी नावांच्या घोषणाही देण्यात आल्या. मोदी यांच्या सभेसाठी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

यापूर्वीचीही सरकारे आली होती. मात्र, त्यांनी हे कलम रद्द करण्याची हिम्मत दाखविली नव्हती. आख दिखानेवाले ये डरनेवाला हिंदुस्थान नही है, असेही त्यांनी बजावले. हे कलम रद्द केल्याने जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक वाढणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुणे ही सांस्कृतिक नागरी, वीरांची भूमी आहे. लोकमान्य टिळक, महात्मा फुले, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांच्या नावाचा उल्लेखही मोदी यांनी केला.

_MPC_DIR_MPU_II

आम्ही 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा आकडा पार करणारच आहोत. काही लोक केवळ आकडेवारी बघतात. युवकांनी आशावादी राहावे. त्यांच्या भरवशावरच आपण प्रगती करणार आहे. गोरगरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना याचा फायदा होणार आहे. विदेशात मोदी नावाचा जो डंका वाजत आहे, तो केवळ 130 कोटी नागरिकांच्या ताकदीमुळे आहे. 21 ऑक्टोबरला सोमवार आहे. आणि त्यापूर्वी रविवार आहे. 2 दिवस सुट्टी आहे.

त्यामुळे आपण महाबळेश्वर, गोवा हो के आते है, मुंबईला जाऊ असे नियोजन करणार, 2 दिवसांची सुट्टी खतरनाक असतात. पण, मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन मोदी यांनी केले. तुमच्या मतांमुळेच मी पंतप्रधान झाल्याची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.