India Corona Update : 680 दिवसांनंतर नीचांकी रुग्ण नोंद, ॲक्टिव्ह रुग्ण संख्याही 675 दिवसांतील निचांकी 

एमपीसी न्यूज – भारतातील कोरोना संसर्ग उतरणीला लागला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 2 हजार 503 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 680 दिवसांतील ही निचांकी रुग्ण वाढ आहे. सध्या देशात 36 हजार 168 ॲक्टिव्ह रुग्ण असून, मागील 675 दिवसांतील ही निचांकी ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. देशवासीयांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 4 कोटी 29 लाख 93 हजार 494 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 24 लाख 41 हजार 449 रूग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 4 हजार 377 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.72 टक्के एवढा झाला आहे.

गेल्या 24 तासांत 27 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 5 लाख 15 हजार 877 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.20 टक्के एवढा झाला आहे.

ICMR च्या आकडेवारी नुसार देशात आजवर 77.90 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 5.32 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 180.19 कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.