Pune News : लॉयला आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा, कल्याणी स्कूलचा चमकदार विजय

एमपीसी न्यूज : लॉयला चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी कल्याण प्रशाला संघाने तिनही वयोगटातील सामने जिंकून आपले वर्चस्व राखले. (Pune News) टाटा ऑटोकॉम्प पुरस्कृत ही स्पर्धा लॉयला प्रशालेच्या मैदानावर सुरु आहे.

मुलांच्या 12 वर्षांखालील गटात पार्थ बधानीने नवव्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलच्या जोरावर कल्याणी प्रशाला संघाने इन्फंट जीझस प्रशाला संघाचा 1-0 असा पराभव केला. याच वयोगटातील अन्य एका सामन्यात विद्याभवन संघाने ह्यूम मॅकहेन्री प्रशालेवर 7-0 असा एकतर्फी विजय मिळविला. विद्याभवनकडून जोनाथन मनोजने तीन आणि अर्णव भोसले, जोनाथन साळवे यांनी प्रत्येकी दोन गोल केले.

Melodies of Asha Bhosale Quiz 2 : जिंका ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’च्या दोन प्रवेशिका!

कल्याणी प्रशाला संघाने 14 वर्षांखालील गटात इन्फंट जीझस प्रशाला संघाचा 3-1 असा पराभव केला. आरव नगरने चौथ्या मिनिटाला गोल केल्यावर देवांशन जोबनपुत्राने दोन गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले. जीझस संघाकडून एकमात्र गोल रुद्र कदमने केला.

कल्याणी संघाची विजयी मालिका 16 वर्षांखालील गटातही कायम राहिली. या गटातही त्यांनी जीझस प्रशाला संघाचाच 8-1 असा पराभव केला. अर्णव मेश्रामने चार, तर सोहम उत्तराने तीन आणि प्रणय चैननीने एक गोल केला.

निकाल –

12 वर्षांखालील :

विद्या भवन प्रशाला : 7 (अर्णव भोसले 4, 26वे मिनिट, जोनाथन साळवे 16, 33 वे मिनिटं, जोनाथन मनोज 18, 24, 30वे मिनिट) वि.वि. ह्यूम मॅकहेन्री मेमोरियल स्कूल : 0

कल्याणी शाळा : 1 (पार्थ बधानी 9वे मिनिट) वि.वि. इन्फंट जीझस हायस्कूल :0

14 वर्षांखालील: विद्या भवन प्रशाला : 3 (मल्हार दरेकर 33 वे; वैभव मेलिन्केरी 36 वे; आयुष ठाकूर 47वे मिनिट) वि.वि. ह्यूम मॅकहेन्री मेमोरियल स्कूल : 0

कल्याणी शाळा : 3 (आरव नगर 4थे; देवांश जोबनपुत्रा 46, 49 वे मिनिट) वि. वि. इन्फंट जीझस हायस्कूल : 1 (रुद्र कदम 33वे मिनिट)

16 वर्षाखालील : कल्याणी शाळा : 8 (अर्णव मेश्राम 2, 8, 25, 56वे मिनिट; सोहम उत्तरा 4थे 13, 48वे मिनिट, प्रणय चैनानी 39वे मिनिट) वि.वि. इन्फंट जीझस हायस्कूल : 1 (भूषण कुलकर्णी 20वे मिनिट).

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.