Pune News : लॉयला आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा, लॉयला प्रशालेने तीनही वयोगटात मिळवला विजय

एमपीसी न्यूज : लॉयला करडंक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत (Pune News) सोमवारी यजमान ल़यला प्रशाला संघाने 12, 14 आणि 16 वर्षांखालील अशा तीनही गटात दणदणीत विजयाची नोंद केली. ही स्पर्धा टाटा ऑटोकॉम्पने पुरस्कृत केली आहे.

लॉयल प्रशालेच्याच मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत लॉयला प्रशालेच्या तीन संघांनी मिळून 29 गोलची नोंद केली.

12 वर्षांखालील गटात अनुराग पारसनीसने तीन, तर आदिराजने नोंदवलेल्या चार गोलच्या जोरावर लॉयला प्रशालेने श्यामराव कलमाडी प्रशाला संघाचा 7-0 असा पराभव केला.(Pune News) त्यानतर पार्थ शिंदेचे चार, परम कुलकर्णीचे तीन, शुभम चौधरी, अरहन खानचे प्रत्येकी दोन आणि आयुष चव्हाण, दर्श कासटने नोंदवलेल्या एकेक गोलच्या जोरावर लॉयला प्रशाला संघाने डॉ. श्यामराव कलमाडी प्रशालेचाच 13-0 असा पराभव केला.

मुलांच्या 16 वर्षांखालील गटात लॉयला प्रशाला संघाने कलमाडी प्रशालेचाच 9-0 असा धुव्वा उडवला. या सामन्यात ब्रायन डिसूझाने 5 गोल केले. त्याला धीर परमारने दोन आणि सम्यक सासर, श्लोक निम्हण यांनी एकेक गोल करून सुरेख साथ केली.

Pune news : प्रतिबंधित पदार्थांचा सुमारे 1.55 लाख रुपये किंमतीचा साठा जप्त

निकाल –

१२ वर्षाखालील: लॉयला प्रशाला : 7 (अनुराग पारसनीस 14, 17, 19 वे मिनिट; आदिराज सिंग 8, 20, 30, 34वे मिनिट) वि.वि. डॉ. श्यामराव कलमाडी प्रशाला : 0

एसएसपीएमएस (बोर्डिंग): 1 (स्वराज माने 34 वे मिनिट)वि.वि. सेंट अरनॉल्ड सेंट्रल स्कूल: 0

14 वर्षाखालील: लॉयला प्रशाला : 13 (शुभम चौधरी 11, 30 वे मिनिट, परम कुलकर्णी 16, 26, 31वे मिनिट, अरहान शेख 28, 32वे मिनिट; आयुष चव्हाण 30 वे मिनिट, पार्थ शिंदे 38, 42, 45, 48वे मिनिट) वि.वि. डॉ. श्यामराव कलमाडी प्रशाला : 0

सेंट अरनॉल्ड सेंट्रल प्रशाला : 7 (विराज बाजारे 3रे; अर्शन सिद्धीबिलाल 19, 22, 26 वे मिनिट, आरुष पाटील ३६वे मिनिट; अथर्व शुक्ला 41वे मिनिट; संजीत डायस 48वे मिनिट) वि.वि. एसएसपीएमएस (बोर्डिंग): 1 (लोकेश सोनवणे 38वे मिनिट)

16 वर्षाखालील: लॉयला प्रशाला : 9 (ब्रायन डिसोझा 10, 20, 23, 33,58वे मिनिट, धीर परमार 25, 46वे मिनिट, सम्यक सासर 48वे मिनिट; श्लोक निम्हण 59वे मिनिट) वि.वि. डॉ. श्यामराव कलमाडी प्रशाला : 0

सेंट अरनॉल्ड सेंट्रल स्कूल : 7 (अश्मित कुननाथ १२वे; जोहान विनोद 14, 44, 48वे मिनिट तनिष्क सोळसे 29वे; आयुष सोनवणे 32, 36वे मिनिट) वि.वि. एसएसपीएमएस (बोर्डिंग) 2 : (कुशाल आहेर 23वे, अथर्व 1ले मिनिट)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.