LPG Gas Cylinder Price : जनसामान्यांना भुर्दंड, एलपीजी पुन्हा महागला

एमपीसी न्यूज : एकीकडे देशात सर्वसामान्य जनता पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीमुळे हैराण होत आहे तर दुसरीकडे आता आणखी एक मोठा झटका नागरिकांना बसला आहे. इंधन दरवाढीनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली आहे. एलपीजीच्या दरात आता 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 

फेब्रुवारी महिन्यातच तीन वेळा एलपीजी गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात सामान्यांना आणखी फटका सहन करावा लागणार का याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. डिसेंबर महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती पाहिल्या असता, 594 रूपयांवरून 644 रूपये प्रति सिलेंडर झाले होते.

_MPC_DIR_MPU_II

फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. या अगोदर 4 फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 25 रूपयांनी वाढ झाली होती. सिलेंडरची किंमत 694 रूपयांवरून 719 रुपये करण्यात आली होती.

तत्पूर्वी, डिसेंबरपासून एलपीजी गॅस दर वाढले आहे. यामध्ये 1 डिसेंबरला दर 594 रुपयांवरून 644 रुपये प्रति सिलेंडर झाले होते त्यानंतर 1 जानेवारी महिन्यात दर 644 रुपयांवरून 694 रुपये प्रति सिलेंडर झाले. तर फेब्रुवारी महिन्यात तीनदा एलपीजी गॅस दर वाढलेले दिसून आले. 4 फेब्रुवारी रोजी दर 694 रुपयांवरून 719 रुपये प्रति सिलेंडर झाले 15 फेब्रुवारीला दर 719 रुपयांवरून 769 रुपये प्रति सिलेंडर झाले. 25 फेब्रुवारी रोजी दर 769 रुपयांवरून 794 रुपये प्रति सिलेंडर झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.