LPG Cylinder Price Hike : घरगुती गॅस सिलिंडर महागला

एमपीसी न्युजकंपन्या सहसा दर महिन्याच्या 1 तारखेला गॅस सिलिंडरच्या किंमतीचा आढावा घेतात. त्याच दिवशी आढावा घेतल्यानंतर, निश्चित दर लागू करण्यात येतो. पण यावेळी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किंमतीचा 15 दिवसांतच आढावा घेऊन किंमत वाढविण्याची घोषणा केली आहे.

यावेळी सर्व प्रकारचे गॅस सिलिंडर महाग केले आहेत. यापूर्वी 1 डिसेंबर 2020 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. आज गॅस सिलिंडर किती महाग झाले आहेत.

पेट्रोलियम कंपन्यांनी आज 14.2 किलो विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ केली आहे. याशिवाय 5 किलो चे छोटू गॅस सिलिंडरच्या किंमतीतही 18 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

याशिवाय 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडर्सच्या किंमतीत 36.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

शहरांनुसार गॅस सिलिंडरच्या नवीन किंमत जाणून घ्या

आयओसीएलच्या वेबसाइटनुसार दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित गॅस सिलिंडर आता 644 रुपये झाला आहे. त्याचबरोबर कोलकाता येथे या गॅस सिलिंडरची किंमत 670.50 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

मुंबईत आता गॅस सिलिंडर 644 रुपयांना तर चेन्नईमध्ये हे गॅस सिलिंडर 660 रुपयांना मिळेल. यापूर्वी या शहरांमध्ये गॅस सिलिंडर्सची किंमत अनुक्रमे 594 रुपये, 620.50 रुपये, 594 रुपये आणि 610 रुपये होती.

19 किलो सिलिंडरची नवीन किंमत जाणून घ्या

19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडर्सच्या किंमतीही वाढविण्यात आल्या आहेत. हे गॅस सिलिंडर आता दिल्लीत 1296 रुपयांना मिळणार आहे. कोलकाता आणि मुंबईमध्ये हे गॅस सिलिंडर 55 रुपयांनी वाढवून 1351.50 आणि 1244 रुपयांना मिळेल.

त्याशिवाय चेन्नईमध्ये हे गॅस सिलिंडर 56 रुपयांनी वाढून 1410.50 रुपये झाले आहे. यापूर्वी या शहरांमध्ये या गॅस सिलिंडरची किंमत अनुक्रमे 1241.50 रुपये, 1296.00 रुपये, 1189.50 रुपये आणि 1354.00 रुपये होती.

सबसिडीवर मिळतात 12 सिलेंडर

सरकार प्रत्येक आर्थिक वर्षासाठी प्रत्येक घरासाठी 14.2 किलोच्या 12 सिलिंडरला अनुदान देते. दुसरीकडे, जर ग्राहक यापेक्षा जास्त गॅस सिलिंडर घेत असेल तर तो बाजारभावाने मिळेल. गॅस सिलिंडरची किंमत दरमहा बदलते. सरासरी आंतरराष्ट्रीय बेंचमार्क आणि परकीय चलन दरात बदल यासारख्या घटकांवर आधारित त्याची किंमत असते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.