LPG New Price : गुड न्यूज! व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 171 रुपयांनी स्वस्त

एमपीसी न्यूज : व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी आजपासून (सोमवार) 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या (LPG New Price) किमती 171.50 रुपयांनी कमी केल्या आहेत, मात्र घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत (LPG New Price) 1856.50 रुपये झाली आहे. तर मुंबईत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरसाठी 1808.50 रुपये मोजावे लागणार आहे.

Indrayani News : आळंदीमध्ये इंद्रायणी माता प्रदूषण मुक्तीसाठी साखळी उपोषणाला सुरूवात

कमर्शियल गॅस सिलेंडर दोन महिन्यांत 263 रुपयांनी स्वस्त

याआधी 1 एप्रिल रोजी म्हणजेच महिनाभरापूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 91.50 रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यानंतर आज आणखी 171.50 रुपयांची कपात करण्यात आली आहेत. त्यामुळे मागील दोन महिन्यांत व्यावसायिक सिलिंडर 263 रुपयांनी स्वस्त झाला आहे. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्या एलपीजी सिलेंडरचे नवीन दर जाहीर करतात.

Maval Fire : एकविरा देवी गडाच्या पायथ्याशी दुकानांना आग

मागील वर्षीच्या तुलनेत 499 रुपयांनी सिलेंडर स्वस्त

दिल्लीमध्ये 1 मे 2022 रोजी व्यावसायिक एलपीजी सिलेंडर  2355.50 रुपयांना उपलब्ध होता. आज त्याची किंमत (LPG New Price) 1856.50 रुपयांपर्यंत खाली आली आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 499 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.