LPG News : व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात घसरण; घरगुती गॅस मात्र स्थिर

एमपीसी न्यूज : महागाईच्या झळा बसत असताना (LPG News) व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाला असून एलपीजी गॅस सिलिंडर कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती कमी केल्या आहेत. सलग दुसऱ्या महिन्यात हा दिलासा मिळाला आहे.

या आधी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 172 रुपयांनी कमी करण्यात आली होती. आता गॅसची किंमत 83.5 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती गॅस सिलिंडरचा दर 1103 रुपयांवर कायम आहे. राज्यात 1 जूनपासून मुंबईत व्यावसायिक गॅस 83.50 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर 1 हजार 808.50 रुपयांवरून 1 हजार 725 रुपयांना विकला जात आहे. दिल्लीमध्ये सिलिंडर 1 हजार 773 रुपयांना विकला जात आहे.

चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत 1हजार 973 रुपये आहे. कोलकातामध्ये (LPG News) व्यावसायिक गॅस सिलिंडरची  किंमत 1 हजार 960.50 रुपयांवरून 1 हजार 875.50 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

Pune : शाळा आणि अंगणवाड्यांची कामे त्वरित पूर्ण करा – चंद्रकांत पाटील

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.