Chichwad : एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल हे करमणुकीसाठी एक उत्तम ठिकाण – कृष्ण प्रकाश

एमपीसी न्यूज :  प्रत्येक क्षण भरभरुन जगल्यास आयुष्य सुखी होते. शहरातल्या गर्दीत एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल हे करमणुकीसाठी एक उत्तम ठिकाण आहे. जीवन हे एक सेलिब्रेशन आहे. ते आनंददायी करणे आवश्यक आहे, असे मत पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.  

दिवाळीच्या निमित्ताने उत्सवाच्या काळात चिंचवड येथील एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलने सेलिब्रेट जिंदगी नावाची एक स्पर्धा आयोजित केली होती. ज्यात ग्राहकांना दररोज आणि साप्ताहिक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळाली आणि यात अंतिम बम्पर बक्षीस एक नवीन ‘मारुती सुझुकी डिजायर’ गाडी होते. त्या लकी ड्रॉच्या विजेत्याला कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते किल्ल्या सुपूर्त करण्यात आल्या.

एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात विजेते वैभव देवधर यांना गाडी देण्यात आली. यावेळी एल्प्रो इंटरनेशनल लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपककुमार व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.

सेलिब्रेट जिंदगीमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आणि लोकांना एल्प्रो सिटी स्क्वेअर येथे सणासुदीच्या काळात आनंद घेण्यासाठी प्रोत्साहित केले. एल्प्रो सिटी स्क्वेअरने दिवाळीच्या हंगामात सर्व ब्रांड्सवर रामायण बेस डिस्काऊंट दिले, दिवाळी मेळा आणि मनोरंजक स्पर्धांमध्ये अप्रतिम सवलतीसह मॉलने ग्राहकांचे स्वागत केले. दिवाळी हंगामातील सर्वात मोठी स्पर्धा ‘शॉप टू विन’ होती, यात सर्व ग्राहकांना  मॉलमध्ये ५९९९ ची खरेदी करा आणि स्पर्धेत भाग घ्या ही ऑफर देण्यात आली होती. सर्व विजेत्यांची पारदर्शक पद्धतीने लकी ड्रॉद्वारे निवड केली गेली.

पीसीएमसी मधील एल्प्रो सिटी मॉल हे सर्वात रमणीय, फॅशन आणि खाद्यपदार्थ आदी सुविधांनी युक्त असे लोकांच्या पसंतीचे भेट देण्याचे ठिकाण बनले आहे.  पीसीएमसीच्या मध्यभागी असलेल्या बर्‍याचश्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रांड्ससह सुसज्ज अश्या या म़ॉलने स्वत:ला एक लोकप्रिय  मॉल म्हणून स्थापित केले आहे . असे बरेचसे ब्रॅण्ड्स  आहेत ज्यांनी पीसीएमसीमध्ये प्रवेश करण्यासाठी एल्प्रो सिटी स्क्वेअरशी भागीदारी केली आहे. अवघ्या एका वर्षात, एल्प्रो सिटी स्क्वेअरने पीसीएमसीच्या लोकांचे लक्ष वेधले आहे, आणि प्रेम मिळवले आहे. आणि ते सर्वांसाठी पसंतीचे ठिकाण बनले आहे. फूड कोर्ट, मल्टिप्लेक्स थिएटर आणि मोठ्या आऊट डोअर प्लाझा ने सुसज्ज असे हे ठिकाण  मैफिली, सामुदायिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी देखील सुयोग्य ठिकाण आहे.

एल्प्रो सिटी स्क्वेअर येथे आयोजित उत्सवांना मोठा यश मिळाले आहे. त्यांनी पीसीएमसीच्या लोकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्याच्या ब्रँडची प्रतिबद्धता आणखी वाढवली आहे. भविष्यासाठी अजून बरेच काही आहे; एल्प्रो सिटी स्क्वेअर पुढेही आणखी बरेचसे ब्रँड, आणखी अनेक स्पर्धा आणि बरेच अनुभव घेऊन निश्चीत ग्राहकांचे मनोरंजन करेल .

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.