Pune news: गॅस शव दाहिन्यांना उपलब्ध होणार एलपीजी गॅसचा पुरवठा 

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या विविध स्मशानभूमींमधील गॅस शव दाहिन्यांना लागणारा एलपीजी गॅस पुरवठा करण्यासाठी मोरेश्र्वर एच. पी. गॅस एजन्सीच्या पूर्व गणन पत्रकापेक्षा १७.७१ टक्के कमी दराने आलेल्या निविदेला स्थायी समितीने आज मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, वैकुंठ, येरवडा, बिबवेवाडी, हडपसर, विश्रांतवाडी, बोपोडी, औंध, वानवडी, कात्रज, धनकवडी, कोरेगाव पार्क, पाषाण, वडगावशेरी, मुंढवा, नायडू रुग्णालयाजवळील कुत्री व मोठ्या प्राण्यांचे दहन करणारे इन्सिरेटर, गंगानगर येथील इन्सिनेटर या ठिकाणच्या गॅस शव दाहिन्यांसाठी अखंड आणि सुरळीत गॅस पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी ८२ लाख तीन हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.