Lucknow: उत्तर प्रदेशात स्थलांतरीत मजुरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात, 24 मजूर मृत्युमुखी

Lucknow: A truck carrying migrant workers crashed in Uttar Pradesh, 23 workers killed

एमपीसी न्यूज – गावी परतणाऱ्या मजुरांच्या ट्रकला उत्तर प्रदेशमधील औरय्या येथे आज (शनिवारी) पहाटे झालेल्या भीषण अपघातात 24 मजुरांचा मृत्यू झाला असून 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन भरधाव ट्रक एकमेकांना समोरून जोरात धडकल्याने हा अपघात घडला. कोतवाली परिसरातील मिहौली राष्ट्रीय महामार्गावर झाला. ट्रकमधील सर्व मजूर दिल्लीहून गोरखपूरला जात होते, अशी माहिती मिळत आहे.

कोरोना नियंत्रणासाठी देशभर गेले 53 दिवस सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागात अडकून पडलेले मजूर हैराण झाले आहे. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने किंवा चालत हे मजूर त्यांच्या परिवारांसह मूळगावांकडे परतताना दिसत आहेत. अशाच घरी परतणाऱ्या स्थलांतरीत मजुरांच्या अपघातांची जणू मालिकाच देशात सुरू आहे.

औरंगाबाद येथील रेल्वे रुळावर झोपलेल्या 16 स्थलांतरीत मजुरांचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. अपघातानंतर मध्यप्रदेशात गुना तर उत्तरप्रदेशात जालोन जिल्ह्यात अपघात झाला होता. त्या पाठोपाठ हा भीषण झाल्याने देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

_MPC_DIR_MPU_II

लॉकडाऊनमुळे देशातील सर्व सेवा ठप्प आहेत. त्यामुळे देशभरात अडकलेल्या मजुरांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लॉकडाऊमुळे हातात काम नाही, तर खिशात पैसे नाही. त्यामुळे हे मजूर मिळेल त्या साधनाचा वापर करून आपल्या मूळ गावी परतण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, मजुरांच्या या स्थलांतरादरम्यान अनेक भीषण अपघात होत आहे.

स्थलांतरीत मजुरांसाठी शासनाने श्रमिक विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था केली आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. अनधिकृत वाहनांचा वापर प्रवासासाठी करून आपला जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.