Lucknow News : कपिल सिब्बल यांची सपाकडून राज्यसभेची उमेदवारी दाखल

एमपीसी न्यूज – काँग्रेसचे माजी नेते कपिल सिब्बल यांनी नुकताच पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज (बुधवारी) त्यांनी समजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. सिब्बल यांनी उत्तर प्रदेशाती पक्षाच्या मुख्यालयात पक्षप्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केली.

दरम्यान, कपिल सिब्बल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अखिलेश यादव म्हणाले की, सपाच्या पाठिंब्याने सिब्बल राज्यसभेवर जाणार आहेत. याशिवाय आणखी दोन लोक सभागृहात जाऊ शकतात.सिब्बल हे ज्येष्ठ वकील असून यापुर्वीच्या काळात त्यांनी संसदेत अनेकदा चांगली मते मांडली आहेत.त्यामुळे आगामी काळात ते समाजवादी पक्षाची आणि स्वत:ची मते सभागृहात मांडतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.