Lumpy Disease : शहरातील 8 जनावरांना लम्पीची बाधा, 700 जनावरांचे लसीकरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Lumpy Disease) शहरात 8 जनावरांना लम्पीची लागण झाली असून 700 जनावरांचे लसीकरण झाले आहेत. शहरातील गोशाळा, पांजरपोळ, गोठे याठिकाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागामार्फत लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. येत्या दहा दिवसांत शहरातील सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती पशू वैद्यकीय विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात गायवंशीय प्राण्यांची संख्या 3 हजार 500 आहे. आतापर्यंत 8 लम्पी विषाणू बाधित जनावरे आढळली आहेत. सुरूवातीला लागण झालेली 5 जनावरे बरे होण्याच्या मार्गावर आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे. तसेच, राज्य पशू संवर्धन विभागातर्फे अडीच हजार लसीचे डोस आले आहेत. पहिल्या टप्प्यात गोशाळांमधील जनावरांचे लसीकरण करण्यात येत असून हे लसीकरण मोफत आहे.

TVS Jupiter : नवी टीव्हीएस ज्युपिटर लाँच करत ‘फास्टेस्ट फाइव्ह मिलियन व्हिइकल्स ऑन रोड’चा विक्रमी टप्पा पार

जनावरांचे लसीकरण करण्यासाठी (Lumpy Disease) महापालिकेच्या वतीने दोन पथकांची स्थापना केली आहे. या पथकांमध्ये 1 डॉक्‍टर, 1 पशुधन पर्यवेक्षक,1 मदतनीस असे तिघांची दोन पथके आहेत. ही पथके एका दिवसात 200 जनावरांचे लसीकरण करत आहेत. यासाठी दोन स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील पशू पालकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन पशू वैद्यकीय विभागाचे उपायुक्त ढोले यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.