गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Bhosari News : मृत जनावरांची उघड्यावर विल्हेवाट; परिसरात दुर्गंधी

एमपीसी न्यूज : लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढलेला असताना पिंपरी-चिंचवडमध्ये मृत जनावरांची उघड्यावर विल्हेवाट लावली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.(Bhosari News)  भोसरी, बालनगरी परिसरात मृत जनावरे उघड्यावर आल्याचे समोर आले. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

देशभरात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. जनावरांना लम्पीची लागण होत आहे. या रोगामुळे जनावरांचा मृत्यू होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गायवंशीय प्राण्यांची संख्या 3 हजार 500 आहे. आतापर्यंत 8 लम्पी विषाणू बाधित जनावरे आढळले आहेत. लम्पी आजारामुळे खबरदारी घेण्याची आवश्यकता असताना शहरात मृत जनावरांची उघड्यावर विल्हेवाट लावली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.(Bhosari News) मृत जनावरांची व्यवस्थित विल्हेवाट लावली नाही. मृत जनावरे अस्तावस्थ पडले आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

PCMC News : कर आकारणी व कर संकलन विभागाचा शनिवारी दुसरा ‘करसंवाद

पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त सचिन ढोले म्हणाले, “शहरातील मृत जनावरे पुरविण्याचे काम एका खासगी एजन्सीला दिले आहे. या एजन्सीने जनावरे पुरविण्याचे काम व्यवस्थित केले नाही.(Bhosari News) पावसामुळे माती वाहून गेल्याने पुरलेली जनावरे अस्तावस्थ झाले आहेत. याबाबत एजन्सीला नोटीस दिली आहे. मृत जनावरे व्यवस्थित पुरण्याचे आदेश दिले आहेत. जनावरे पुरून त्याची छायाचित्रे पाठविण्याची सूचना एजन्सीला केली आहे”.

 

 

spot_img
Latest news
Related news