Pimpri: महापालिका शहर अभियंतापदी अ. मा. भालकर

सार्वजनिक बांधकाम विभागाने केली नियुक्ती

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर अभियंतापदी प्रतिनियुक्तीवर अ. मा. भालकर यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहसचिव सं. द. सुर्यवंशी यांनी जारी केला आहे.

महापालिकेचे शहर अभियंता अंबादास चव्हाण 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे हे पद रिक्त आहे. तात्पुरता स्वरूपात सह शहर अभियंता राजन पाटील यांच्याकडे शहर अभियंतापदाचा अतिरिक्त पदभार दिला होता.

_MPC_DIR_MPU_II
  • आता राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अधिकारी अ. मा. भालकर यांची पदोन्नतीने महापालिकेत शहर अभियंतापदी नियुक्ती केली आहे. भालकर यांची नाशिक महापालिकेत बदली झाली होती. परंतू, ते रुजू झाले नव्हते.

महापालिकेत यापूर्वी प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांनी शहर अभियंतापद भूषविले आहे. त्यामध्ये एकनाथ उगिले, नागनाथ उमाटे यांचा समावेश आहे. न्यायालयाचा आदेशानुसार शहरातील अनधिकृत बांधकामांची पाडपाडी सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारचे प्रतिनियुक्तीवरील अधिकारी महापालिकेत येण्यास धजावत नव्हते. मात्र, आता कारवाई सौम्य झाली आहे. त्यामुळे अधिकारी येण्यास राजी झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.