M.S. Dhoni : यंदाच्या आयपीएलनंतर धोनी होणार का निवृत्त? दीपक चहर म्हणाला..

एमपीसी न्यूज – भारतीय कर्णधार एम. एस. धोनी याने आयपीएलचा संघ चेन्नई सुपर किंगस् यांचे नेतृत्व करत बरेच यश मिळवले आहे. पण यंदाच्या 2023 वर्षातील आयपीएलची मालिका (M.S. Dhoni) ही धोनीची अखेरची असेल असा बऱ्याच क्रिकेट चाहते आणि धोनी चाहते यांना प्रश्न आहे. 

या आधी धोनीने बऱ्याच वेळा इशारा दिला आहे, की ही आयपीएल त्याची शेवटची असणार आहे. परंतु, दीपक चहरने  धोनीच्या आयपीएलमधून निवृत्तीच्या निर्णयावर एक मोठे अपडेट दिले आहे. तो म्हणाला, की हे त्याचे शेवटचे वर्ष असेल असे कोणीही सांगितले नाही. किमान, त्याने तरी नाही. आशा आहे, तो आणखी खेळेल. आम्हाला असे काहीही माहित नाही, त्याला जितके खेळता येईल तितके त्याने खेळावे अशी आमची इच्छा आहे.

तर त्याला कधी निवृत्ती घ्यायची हे माहित आहे. त्याच्या हाताखाली खेळणे हे स्वप्न होते. तो या वर्षी आयपीएलमध्ये फलंदाजी करताना दिसेल असे चहर म्हणाला.

Bhosari News : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘स्वप्नातील भारत’ विषयावर खुली निबंध स्पर्धा

धोनी याचे क्रिकेट जगतमध्ये करोडो चाहते आहेत. जर तो निवृत्त झाला, तर बऱ्याच फॅन्सला वाईट वाटेल व काहीजण तर क्रिकेट बघणेही बंद करतील. भलेही भारतीय क्रिकेट संघातून (M.S. Dhoni) त्याने निवृत्ती घेतली असेल तरीही त्याला आयपीएलमध्ये बघायला बरेच प्रेक्षक उत्साहीत असतात. तर येणारी आयपीएल ही त्याची शेवटची असेल का? किंवा तो अजून खेळेल? हे फक्त तोच सांगू शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.