Pune : माण येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज – जय शिवराय प्रतिष्ठान संचालित न्यू इंग्लिश स्कूल, माण येथे मॅजिक बस इंडिया फाउंडेशन या कंपनीच्या सहकार्यातून दि. 15 आणि दि. 16 मार्च (Pune) या दोन दिवसांत विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी माध्यमाच्या या माध्यमिक शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सातत्यपूर्ण योगदानातून अभ्यासाव्यतिरिक्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राच्या विविध भागांतून स्थलांतरित झालेले वीटभट्टी कामगार, बांधकाम मजूर, शेत मजूर, सुरक्षारक्षक आणि घरकाम करणाऱ्या अन् अतिशय बेताची आर्थिक क्षमता असलेल्या पालकांची मुले या शाळेत आहेत.
बुधवार, दि. १५ मार्च रोजी सेवानिवृत्त शिक्षिका आणि ज्येष्ठ साहित्यिका शोभा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली महिला पालक, माजी विद्यार्थिनी आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर सत्राचे (Pune) आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिका प्रतिमा कुंभार, डॉर्बिट फाउंडेशनच्या संस्थापिका इम्पा श्रीवास्तव, विजया श्रीवास्तव, साहित्यिक ह.भ.प. अशोकमहाराज गोरे, नारायण कुंभार, मुख्याध्यापक अंबादास रोडे यांनी ऐतिहासिक ते आधुनिक काळातील कर्तृत्ववान महिलांच्या देदीप्यमान कार्याची माहिती दिली.
Nigdi News : महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण
मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना फाउंडेशनचे विभागीय व्यवस्थापक शरणकुमार खंडू आणि प्रकल्पप्रमुख संतोष गोंधळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पिरंगुट येथील भारतातील पहिल्या टूजी बायोसीएनजी प्लान्टला क्षेत्रभेटीसाठी नेण्यात आले. शेतीतील टाकाऊ घटकांवर प्रक्रिया करून सीएनजी वायूची निर्मिती कशी केली जाते याविषयी मौलिक माहिती या प्रकल्पभेटीतून विद्यार्थ्यांना देण्यात आली.
गुरुवार, दिनांक १६ मार्च रोजी पाचवी ते नववीपर्यंतच्या सुमारे दोनशे गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2023-24 यासाठीच्या शालेय उपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले.(Pune) मॅजिक बस इंडियाच्या लेखाविभागप्रमुख तृप्ती पायगुडे, मुख्याध्यापक अंबादास रोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्वेता मुंडे आणि संदीप पाटोळे; तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यातून हे दोन दिवसीय उपक्रम यशस्वी झाले.