पुणे: ब्राह्मण महासंघातर्फे सोमवारी चिनी मालाची होळी

Made in China products to be burnt by Bramhin Mahasangh on Monday.

एमपीसी न्यूज – ब्राह्मण महासंघातर्फे सोमवारी ( दि. 8) दुपारी 2 वा.  चिनी मालाची होळी करण्यात येणार आहे. कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारक येथे चीन विरोधी घोषणा देऊन त्या देशातील मालावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी दिली.

देशातील कोणत्याही क्रांतीची सुरवात लहान आंदोलनातूनच होते. पुण्यातून हे आंदोलन झाल्याने ती यशस्वी सुद्धा होतात. छत्रपती इथले, टिळक इथले, चापेकर आणि सावरकर सुद्धा इथलेच.

चीन आपली गरज नाही, आपण चीनची आवश्यकता आहोत. या चीनवर बहिष्कारची सुरवात पण आम्ही करणार आहोत, असेही दवे यांनी सांगितले. हे लोण संपूर्ण देशात पोहोचेल आणि त्याची धग चीनला जाणवणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

इतरांनी आपल्या भागातील मोठ्या चौकात येऊन  दुपारी 2 वाजता असेच आंदोलन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. चीन विरोधी घोषणा द्यायच्या असून, हा महासंघाचा कार्यक्रम आहे तो यशस्वीच करायचा आहे.

सरकारी बंधने आणि नियम पळूनच आंदोलन करावे, असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सध्या चीन विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण महासंघाचे आंदोलन महत्वपूर्ण मानले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.