Madhushree : प्राधिकरणात रविवारपासून मधुश्री व्याख्यानमालेला प्रारंभ

एमपीसी न्यूज – मधुश्री कला आविष्कार (Madhushree) आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 29 मे ते 31 मे 2022 या कालावधीत तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

संजय काळे क्रीडांगण, पेठ क्रमांक 28 प्राधिकरण येथे दररोज सायंकाळी ठीक साडेसहा वाजता व्याख्याने होतील. रविवार, दिनांक 29 मे रोजी झी मराठी हास्यसम्राट फेम अजितकुमार कोष्टी ‘हसवणूक’ या एकपात्री विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रथम पुष्प गुंफणार आहे. माजी नगरसेविका शर्मिला बाबर अध्यक्ष म्हणून आणि उद्योजक अतुल इनामदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

Pimpri News : महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेला ‘उत्कृष्ट शाखा पुरस्कार’ जाहीर

सोमवार, दिनांक 30 मे रोजी कॉर्पोरेट ट्रेनर सतीश सगदेव ‘भारताचा स्वातंत्र्यलढा आणि विज्ञान’ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफणार असून माजी उपमहापौर शैलजा मोरे अध्यक्षस्थानी आणि ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. मंगळवार, दिनांक 31 मे रोजी ‘तणावरहित जीवन’ या विषयावर प्रा. शैलजा सांगळे व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प गुंफणार असून लायन्स क्लब इंटरनॅशनल (कौशल्य विभाग) चेअरपर्सन अशोक येवले अध्यक्ष म्हणून आणि कलारंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित गोरखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. विनाशुल्क असलेल्या या व्याख्यानमालेचा लाभ सर्व नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन मधुश्री कला (Madhushree) आविष्कारच्या अध्यक्ष माधुरी ओक यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.