Magh : ओळख मराठी महिन्यांची – भाग 11– वैविध्याने नटलेला माघ महिना

एमपीसी न्यूज – मराठी महिन्याची माहिती या लेखमालेतील अकरावा ( Magh)  लेख- माघ महिना . या महिन्याच्या पौर्णिमेला ‘मघा’ नक्षत्र असते म्हणून याचे नाव माघ असे पडलेले आहे हा महिना विविधतेने नटलेला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला येणाऱ्या गणेश चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. ‘गणपती बाप्पा मोरया’ या गजरात गणेशाचा जन्म उत्साहात साजरा केला जातो. त्यानंतर येते वसंत पंचमी, विद्येची देवी माता सरस्वती यांचा जन्मदिवस. या काळात वसंत ऋतूची सुरुवात होते. आला वसंत ऋतू आला किंवा कोकीळ कुहू कुहू बोले  ही गाणी आठवत असतानाच कोकिळेचे कुहू कुहू ऐकू येऊ लागते. सृष्टीचे रूप हळूहळू पालटू लागते. आता झाडे पर्णहीन दिसत आहेत पण लवकरच त्यांना कोवळी पालवी फुटायला सुरुवात होते.

Pune : बॅग मौल्यवान साहित्यासह केली पोलिसांच्या हवाली, इमानदार रिक्षा चालकाचे पोलिसांनी केले कौतुक

त्यानंतर येणाऱ्या सप्तमीला रथसप्तमी असते .सूर्यनारायण या दिवशी पृथ्वीवर आपला सर्वात जास्त प्रकाश फैलावत असतात त्यामुळे सूर्योपासना करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. तसेच संक्रांती पासून सुरू झालेल्या हळदीकुंकवाची सांगता या दिवशी होते. त्यानंतर येते माघी पौर्णिमा, माघी पौर्णिमेला नदीस्नानाला फार महत्त्व आहे.

‘महाशिवरात्री’ हा शिवभक्तांसाठी पर्वणी असलेला दिवस याच महिन्यात येतो . याशिवाय शिवाजी महाराज जयंती, गजानन महाराज जयंती, रामदास नवमी, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज जयंती याच महिन्यात येते . जागतिक मुद्रण दिन, मराठी भाषा दिन ,राष्ट्रीय विज्ञान दिवस हे सुद्धा याच महिन्या साजरे करण्यात येतात .अशा या वैविध्याने नटलेल्या माघ महिन्याच्या आपल्या सर्वांना ( Magh)  शुभेच्छा.

लेखिका – रंजना बांदेकर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.