Pimpri : घोरावडेश्वर शिव मंदिरात शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त महाअभिषेक व महाआरती

पूरग्रस्तांना 200 ब्लँकेट्सची मदत

एमपीसी न्यूज – श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी घोरावडेश्वर विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने घोरावडेश्वर डोंगरावरील शिव मंदिरात महाअभिषेक व महाआरती करण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत म्हणून 200 ब्लँकेट्स रघुवीर शेलार स्नेह ग्रुपच्या कार्यकर्त्यांकडे पाठवण्यात आले.

त्याप्रसंगी अध्यक्ष घोरवडेश्वर विकास भाऊसाहेब पाणमंद व नवनिर्वाचित अध्यक्ष दत्तामामा तरस, वैराग्यमूर्ती हभप सुदाम महाराज भोसले, नगरसेवक, उपाध्यक्ष घोरावडेश्वर विकास प्रतिष्ठान रघुवीर उद्धवराव शेलार, उपाध्यक्ष देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड, विश्वस्त घोरावडेश्वर विकास प्रतिष्ठान संजय राऊत, उपाध्यक्ष विठ्ठल भेगडे, खजिनदार पोपटराव भेगडे नवनिर्वाचित खजिनदार राजेश मुर्हे सचिव घोरावडेश्वर विकास प्रतिष्ठान योगेश शेलार, सहखजिनदार निलेश राक्षे, कार्याध्यक्ष रवींद्र घारे, विस्वस्थ हभप मुकुंदनाना राऊत, शिवाजी सावंत, विजय भोंडवे,दत्तोपंत शेलार (पाटील) , मधुकर बोडके,श्रीकृष्ण भेगडे, शांताराम भोते, किसन भेगडे, तानाजी वाघुले, नरहरी बालघरे,शैलेश मुर्हे, रामनाथ गराडे, संचालक शंकरराव शेलार नगरी सहकारी पतसंस्था अमित भेगडे,जिल्हा मंत्री बजरंगदल संदेश भेगडे , रघुवीर शेलार स्नेह ग्रुपचे कार्यकर्ते अक्षय शेलार, अमोल शेलार,अनिल शेलार, प्रफुल शेलार,सचिन भेगडे, मंगेश शेलार, महेश अरशेलू ,विशाल देशमुख पुजारी बोडके महाराज तसेच पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.