Mahad : भूगोल फाउंडेशनतर्फे रायगडावर वृक्षारोपण वृक्ष संवर्धन, पर्यावरण जागरण अभियान

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवड, पुणे येथील भूगोल फाउंडेशन संस्थेने नुकतेच किल्ले रायगड येथे दुर्गभ्रमण, स्वच्छता, प्रदूषण व पर्यावरण समतोल या विषयांशी संबंधित लोकसहभागातून एका मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्लॅस्टिमुक्त रायगड किल्ला व वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्थानिक लोकांमध्ये जनजागृती, प्रबोधन याचा समावेश होता.

भूगोल फाउंडेशनने सर्वप्रथम महाड शहरांमध्ये डॅा.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व वनविभागाच्या साथीने पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी पत्रकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर राजमाता जिजाउंच्या समाधी स्थळाला भेट देऊन पाचाड परिसरात पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. पाचाड व हिरकणीवाडीच्या मध्ये किल्ले रायगडाच्या पायथ्याशी कायमस्वरूपी किल्ल्याचे आत्मवृत्त, प्रदूषण, पर्यावरण याविषयीचा फलक लावण्यात आला. त्याचवेळी पर्यावरण व स्वच्छता याविषयी भूगोल फाउंडेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठल वाळुंज यांनी स्थानिक गावकऱ्यांचे प्रबोधन केले.

त्यावेळी वनविभाग, पुरातत्त्व विभाग, संतनगर मित्र मंडळ, इंद्रायणी सेवा संघ तसेच डॅा.आंबेडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते. गड परिसरामध्ये साफसफाई करण्यात आली. या मोहिमेत प्लॅस्टिक, बा्ॅटल, व अविघटनशील कचरा गोळा करण्यात आला. कड्याकपारीत, झाडाझुडपात जाऊन कचरा गोळा करण्यात आला.

रायगडावर वृक्षसंपदा कमी आहे म्हणून तेथे तेथील पर्यावरणाशी जुळणारी देशी व जंगली 60 झाडे लावण्यात आली. ही झाडे स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निसर्ग विभाग यांनी त्यांच्या नर्सरी मधून उपलब्ध करून दिली. या झाडांचे संवर्धन झाले पाहिजे म्हणून त्यांना प्लॅस्टिक बाटल्यांची पाण्याची सलाईन लावण्यात आली. जेणेकरून कमी पाण्यामध्येही त्याचे संवर्धन होईल. वृक्षसंवर्धनाची जबाबदारी पुरातत्त्व खात्याचे अधिकारी बी बी जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र उत्तेकर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घेतली. प्रत्येकी एका व्यक्तीला सहा झाडांचे पालकत्व देण्यात आले असे दहा जणांनी 60 झाडांचे पालकत्व स्वीकारले. त्यानंतर गडाच्या पायथ्याशी व गडावर स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत 6 पोती प्लॅस्टिक व थर्माकोल सदृश अविघटनशील कचरा गोळा करण्यात आला अशी मोहीम प्रत्येक महिन्याला एका किल्ल्यावर राबवली जाते.

भूगोल फाउंडेशनची ही मोहीम शिवनेरी पासून सुरु रायगडापर्यंत पोचली. आत्तापर्यंत शिवनेरी, लोहगड, पुरंदर, राजगड, तोरणा, तिकोणा, सिंहगड, तुंग, कोरीगड, चावंड, श्रीक्षेत्र भीमाशंकर व आता तीर्थक्षेत्र किल्ले रायगड स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाच अभियान राबवण्यात आलेले आहे.

यावेळी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी बी बी जंगले, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शिंदे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनाजी गुरव, डॅा.प्रगती पाटील, डॅा. राहुल भोसले, प्रा पुरूषोत्तम पिलपुलवार यांचेही मार्गदर्शन व मदत झाली. या मोहिमेमध्ये पुरातत्त्व खात्याचे राजेंद्र उत्तेकर व त्यांचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. वनपाल ए डी जाधव, वनरक्षक टी एस् पठाण व त्यांचे सर्वच सहकारी, माणगावचे गणेश दिघे व सहकारी, पाचाड ग्रामस्थ मधुकर गायकवाड, सुदाम गायकवाड, हिरकणीवाडी ग्रामस्थ लक्ष्मण औकिरकर, गणेश औकिरकर, रायगडवाडीचे ग्रामस्थ शांताराम हिरवे, कल्पेश जाधव, नेवाळेवाडीचे संतोष शिंदे, बाबु कोकरे व इतर अनेक ग्रामस्थ या मोहिमेमध्ये मोठया संख्येने सहभागी झाले होते.

साहित्यिक प्रा दिगंबर ढोकले, भूगोल फाउंडेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठल (नाना) वाळूंज, निकुंज रेंगे, सुनील काटकर, अरविंद देवकर, बाळासाहेब गरुड, विठ्ठल लंघे, अविनाश खोसे, सागर भोईर, चव्हाण सुहास, प्रकाश चव्हाण, शरद दळवी, राहुल शिंगोटे, लक्ष्मण पवार, यशपाल कलसुंगी, अमित पात्रा, सुरेश शर्मा, विजय क्षीरसागर, समीर कालेकर, डी ए जगताप, अक्षय गोटे, विशाल पाणसकर, अंकुश आकाश राहुल जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

संतनगर मित्र मंडळ व इंद्रायणी सेवा संघाचे जगन्नाथ माने, साहेबराव गावडे, शिवराम काळे, नवनाथ कोलते, कामगार नेते हनुमंत लांडगे, कर्नल तानाजी अरबुज, सायकल मित्र सतीश पावसे, सुनील मदने, शशिकांत वाडते, चंद्रकांत थोरात, बंडु येरावार, विशाल शेवाळे, किरण शेटे व आझाद हिंद मित्र मंडळ काळेवाडी अतुल नढे, अॅड.सागर नढे, सपकाळे तसेच महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी अंकित मोरे व प्रज्ञा थले सहकारी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.