Pune : स्वच्छता कर्मचाऱ्याने गाण्यांमधून घातले पुणेकरांच्या डोळ्यात स्वच्छतेचे झणझणीत अंजन (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- कचराकोंडीचे शहर ही पुण्याची ओळख पुसण्यासाठी महापालिकेचे सर्वच अधिकारी कर्मचारी प्रयत्न करतात. पण नाठाळ पुणेकर याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यांना पुणे महापालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्याने गाण्यांमधून स्वच्छतेचा आणि प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय.

स्वच्छ पुण्यासाठी जनजागृती करण्यावर महापालिका दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च करते, मात्र, ऐकतील ते पुणेकर कसले ! परंतु, आता पुणेकरांना आपल्या गाण्यातून कचरा समस्येचा संदेश देणारे  पर्वती परिसरात स्वच्छता सेवक असलेेेले  महादेव जाधव हे आपल्या सुरेल गाण्यातून ही कचरा समस्या झाडण काम करताना मांडतात. रस्त्याने जाणारे पुणेकर तेवढयाच आत्मीयतेने ते ऐकून त्यांना दादही देत आहेत. जाधव यांचा हा गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऐका ते काय म्हणतात ते……. आणि पुणेकरांनी नव्हे तर सर्व शहरातील नागरिकांनी त्यातून बोध घ्यावा ही अपेक्षा…..

हा पालिकेचा स्वच्छता कर्मचारी पुणेकराना चांगलाच भावला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.