Mahalunge : झोपेत असताना डोक्यावरून मिक्सर गाडीचे चाक गेल्याने तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : डोक्यावरून मिक्सर गाडीचे चाक गेल्याने झोपेत (Mahalunge) असणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.6) रात्री वराळे, खेड येथे घडला आहे.

अंगद अरूण तिवारी (वय 38) असे मयत इसमाचे नाव असून याप्रकऱणी मुकेश अरूण तिवारी (वय 44 रा. वराळे) यांनी फिर्याद दिली असून मिक्सर चालक शेषेराव साहेबराव आघाव (वय 46 रा.मोई) याला एमय़ाडीसी महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हा फिर्यादीचा भाऊ होता. तो झोपला असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील मिक्सर गाडी (एम एच 14 जी.यू. 9486) हि बेदरकारपणे चालवून फिर्यादीच्या भावाच्या डोक्यावरून (Mahalunge) घातले. यातच अंगद याचा मृत्यू झाला. म्हालुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Shirur : भाजपच्या शिरुर लोकसभा निवडणूक प्रमुखपदी आमदार महेश लांडगे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.