Mahalunge : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि.27) वासुली एमआयडीसी येथे दुपारी घडला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात टेम्पो (एचएस 04 एफ सी 5705)च्या अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे.  या अपघातात भुषण नवनाथ गायकवाड (वय 20 रा. शिंदेगाव, खेड) यांचा मृत्यू झाला आहे.

Pune : ‘हिंदू एकता दिंडीची’ सांगता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टॅम्पो चालकाने त्याच्या ताब्यातील टेम्पो निष्काळजीपणे चालवत दुचाकीवरून येणाऱ्या भूषणला जोरदार धडक दिली. या धडकेत भूषण गंभीर जखमी झाला व त्यात त्याचा मृत्यू झाला.

अपघात झाला असताना ही आरोपी तेथे न थांबता तिथून पसार झाला.याच्यावरून चालकावर गुन्हा दाखळ केला असून म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत (Mahalunge) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.