Mahalunge : महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पकडला दहा किलो गांजा

एमपीसी न्यूज –  म्हाळुंगे (Mahalunge) एमआयडीसी पोलिसांनी वासुली फाटा येथे कारवाई करून एकास अटक केली. त्याच्याकडून तब्बल 10 किलो 104 ग्राम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 6) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास करण्यात आली.

Alandi : पालखी सोहळ्या निमित्त अलंकापुरीमध्ये वारकरी भाविकांची येण्यास सुरुवात

रवींद्र काशीराम राठोड (वय 38, रा. कडूस, ता. खेड. मूळ रा. अकोला) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह विकास बधाले (रा. नवलाख उंबरे, ता. मावळ) आणि पठारे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शरद खैरे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासुली फाटा येथे एका हॉटेल समोर एकजण गांजा घेऊन येणार असल्याची माहिती महाळुंगे एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत रवींद्र राठोड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी दोन लाख 52 हजार 600 रुपये किमतीचा 10 किलो 104 ग्राम  गांजा आणि 30 हजारांची एक दुचाकी जप्त केली.

आरोपी हा गांजा विक्रीसाठी आला होता. त्याने हा गांजा नवलाख उंबरे येथील विकास बधाले आणि पठारे नावाच्या व्यक्तीकडून आणला असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी त्या दोघांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. महाळुंगे (Mahalunge) एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.