Mahalunge News : माथाडी कामगारांचे आर्थिक शोषण; सात जणांवर गुन्हा

एमीपीसी न्यूज – माथाडी कामगारांचे (Mahalunge News) आर्थिक शोषण आणि पिळवणूक करून त्यांच्या दरमहा पगारात 15 ते 20 हजार रूपयांची फसवणूक करण्याचा प्रकार चाकण एमआयडीसीतील निघोजे येथील महिंद्रा कंपनीत उघडकीस आला आहे.

याप्रकरणी माथाडीच्या सात जणांवर म्हाळूंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव मधुकर कंद, नितीन दौंडकर, नवनाथ थिटे, अतुल गारगोटे, राहुल आंद्रे, शरद कंद, संदीप मधुरे अशी गुन्हा दाखल केलेल्या सात जणांची नावे आहेत. याबाबत राजेंद्र कैलास नखाते (वय 31, रा. टेल्को कॉलनी, वडगाव-मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.

Chinchwad Bye Election : आम्ही भावनिक राजकारण करत नाही म्हणत ‘आप’ने ठोकला शड्डू

आरोपी गेल्या दोन – तीन वर्षापासून आरोपी निघोजे येथील महिंद्रा कंपनीतील (Mahalunge News) माथाडी कामगारांचे आर्थिक आणि पिळवणूक करत होते. कामगारांच्या दरमहा पगारामध्ये 15 ते 20 हजार रूपयांची फसवणूक ते करत होते. याबाबत कामगारांनी माथाडी बोर्ड व महिंद्रा कंपनी प्रशासनालाही कळविले, मात्र माथाडी बोर्ड तसेच कंपनीकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. महिला फौजदार भंडारवाड तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.