Mahalunge News : फिरायला नेऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – फिरायला जाण्याच्या बहाण्याने तरुणीला (Mahalunge News) बोलावून घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तरुणी गरोदर राहिल्यानंतर तिने लग्नाबाबत विचारले असता तरुणाने लग्न करण्यास नकार दिला. हा प्रकार एप्रिल 2022 मध्ये खराबवाडी येथे घडला.

पीडित 20 वर्षीय तरुणीने सात महिन्यानंतर महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोमल कांत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mahavitaran : वीजबिल भरण्याबाबत बनावट संदेशाद्वारे आर्थिक फसवणूकीचे प्रकार; सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात आरोपीने (Mahalunge News) फिर्यादीला फोन करून फिरायला जाण्याच्या बहाण्याने बाहेर बोलावून घेतले. त्यानंतर मोकळ्या शेतात घेऊन जात त्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. यामध्ये तरुणी गरोदर राहिली. तरुणीने आरोपीकडे लग्नाची मागणी केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.