Mahalunge : खराबवाडी येथे घरफोडीत दीड लाखांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – घरफोडी (Mahalunge) करून अज्ञातांनी एक लाख 45 हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 22) सकाळी खराबवाडी येथे घडली.

Chinchwad Bye Election : आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे – राजेश देशमुख

आकाश रामदास शिंदे (वय 28, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर (Mahalunge) कुलूपबंद असताना शनिवारी रात्री अकरा ते रविवारी सकाळी सात वाजताच्या कालावधीत फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातून एक लाख 45 हजार रुपये रोख रक्कम अज्ञातांनी चोरून नेली. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.