Mahalunge : पिस्टल बाळगल्या प्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक

एमपीसी न्यूज – पिस्टल बाळगल्या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले (Mahalunge) आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 23) खेड तालुक्यातील कोरेगाव येथे करण्यात आली.

आकाश आण्णा भोकसे (वय 23, रा. कुरकुंडी, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी यांना माहिती मिळाली की, कोरेगाव येथील कॉर्निंग कंपनीजवळ आकाश भोकसे हा पिस्टल घेऊन येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला. आकाश हा कंपनी जवळ आला असता त्याला पोलिसांची चाहूल लागली. त्यावेळी तो पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतुस असा एकूण 25 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी आकाश हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सन 2017 मध्ये त्याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तसेच सन 2022 मध्ये खेड पोलीस ठाण्यात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याचा एक गुन्हा दाखल आहे.

Mahalunge : सराईत वाहन चोरास अटक; सात दुचाकी जप्त

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उप आयुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर. उपनिरीक्षक विलास गोसावी, पोलीस अंमलदार अमोल बोराटे, युवराज बिराजदार, संतोष काळे, विठ्ठल वडेकर किशोर सांगळे, शिवाजी लोखंडे, राजेंद्र खेडकर, आमोल माटे, गणेश गायकवाड, संतोष वायकर, राहुल मिसाळ, शरद खैरे यांच्या पथकाने केली (Mahalunge) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.