Mahalunge : नोकरीच्या आमिषाने कंपनी मालकाकडून अत्याचार, मर्डर करण्याची धमकी

एमपीसी न्यूज – नोकरी (काम) देण्याच्या आमिषाने कंपनी (Mahalunge) मालकाने एका 19 वर्षीय महिलेवर बलात्कार करत फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पोलिसात तक्रार देण्याचा इशारा दिल्यानंतर कंपनी मालकाच्या मित्राने मर्डर करण्याची धमकी दिला. हा प्रकार 13 ऑगस्ट 2022 रोजी खेड तालुक्यातील म्हाळुंगे गावच्या हद्दीत घडला.

याप्रकरणी 19 वर्षीय महिलेने 1 फेब्रुवारी 2023 रोजी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी कंपनी मालक असलेला आरोपी विजयकुमार जनार्धन पोतदार (वय 55, रा. संकेश्वर डाईन आयकॉन, रावेत) आणि त्याचा साथीदार मिथुन जोगेंदर कुमार दास (वय 28, सारा सिटी समोर, खराबवाडी, खेड) या दोघांना अटक केली आहे.

फिर्यादी नवीन कंपनी शोधत होती. फिर्यादीच्या तोंड ओळखीच्या मुलीने एका कंपनीचे मालक असलेल्या आरोपी विजयकुमार याचा फोन नंबर दिला. त्यानुसार फिर्यादीने आरोपी विजयकुमार याला फोन केला. कामाची गरज असल्याचे सांगितले. आरोपी विजयकुमार याने कामाचे आमिष देवून फिर्यादीला ढाब्यावर नेत फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले.

Chinchwad Bye Election : भाजपकडून अश्विनी जगताप यांनी घेतला उमेदवारी अर्ज

त्याचा धक्का बसल्याने फिर्यादीने त्याबाबत आरोपीकडे विचारणा केली. त्यावेळी (Mahalunge) आरोपीने मोबाईलमध्ये तुझे फोटो आहेत. ते मी व्हायरल करील अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी विजयकुमार हा वेगवेगळ्या नंबरवरुन वेगवेगळ्या लोकांमार्फत फोन करुन फिर्यादीला त्रास देवू लागला.

फिर्यादीने तुझी पोलीस स्टेशनला तक्रार करणार असल्याचे आरोपीला सांगितले. त्यानंतर आरोपी विजयकुमार याने त्याचा मित्र मिथुन याला फिर्यादीचा मोबाईल नंबर दिला. आरोपी मिथुन याने फिर्यादीस फोन करुन विजयकुमार याच्याबरोबर काय केले आहे. मला माहित आहे. तु जर त्याच्याविषयी कोणाला काही एक सांगितले. तर, तुझा मर्डर करील अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.