India Green Energy Award 2021 : यंदाच्या ‘इंडिया ग्रीन एनर्जी’ पुरस्कारासाठी महानिर्मितीची निवड

एमपीसी न्यूज : इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी संस्थेच्या वतीने हरित ऊर्जानिर्मितीसाठी दिला जाणारा यंदाचा ‘इंडिया ग्रीन एनर्जी’ हा पुरस्कार महानिर्मितीला जाहीर झाला आहे. सन 2021 करिता इंडिया ग्रीन एनर्जी पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महानिर्मितीचे अभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेंतर्गत उभारण्यात आलेले व नियोजित सौर ऊर्जा प्रकल्पांची दखल घेत महानिर्मितीला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार 20 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे.

पर्यावरण रक्षण आणि शेतकऱ्यांना दिवसाही ऊर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही हरित ऊर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. या पुरस्काराने आमच्या प्रयत्नांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. यामुळे हा पुरस्कार या प्रयत्नांना नवे बळ देणारा आहे, असे डॉ. राऊत म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.