Pimpri News : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी पिंपरीतील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी (दि. 6) पिंपरी येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन (Pimpri News) करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुयायी येत असतात. त्यामुळे या चौकात गर्दी होते. याच मार्गावरून वाहने आल्यास वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पिंपरी वाहतूक विभागातील वाहतुकीत मंगळवारी बदल करण्यात आले आहेत. याबाबत वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी आदेश दिले आहेत.

महावीर चौक चिंचवड कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी सर्व्हिस रोडने येणारी वाहतूक बंद करून ती डी मार्ट इन ग्रेड सेपरेटर मधून वळविण्यात आली आहे. नाशिक फाट्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे सर्व्हिस रोडने येणारी वाहतूक बंद करून ती डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर इन व एच पी पंप खराळवाडी ग्रेड सेपरेटर इन मधून वळविण्यात आली आहे.

PCMC News: पिंपरी चिंचवड शहराच्या घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात आयुक्त शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक

स्व. इंदिरा गांधी पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे येणारी वाहतूक बंद असेल. ही वाहने स्व. इंदिरा गांधी पुलावरून मोरवाडी चौकातून इच्छित स्थळी जातील.(Pimpri News) नेहरूनगर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असेल. ही वाहने एच ए कॉर्नर बस स्टॉप येथून मासुळकर कॉलनी मार्गे जातील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.