Maharashtra : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 189 कैद्यांची कारागृहतून सुटका होणार

एमपीसी न्यूज : राज्यातील विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या 189 बंदीनी विशेष माफीनुसार शिक्षेतून सुट देऊन हे बंदी कारागृहातून 26 जानेवारी रोजी सुटका करण्यात येणार आहे. चांगली वर्तवणूक या निकषानुसार त्यांना सोडले जात असून, स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सवानिमित्त शासनाने ही योजना राबविली जात आहे, असे कारागृह विभागाचे विशेष पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली.

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त केंद्र सरकार “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” म्हणून यंदाचे वर्ष साजरा करत आहे. त्यानिमित्ताने देशभरातील कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यात (गंभीर गुन्हे सोडून) शिक्षा भोगत असलेल्या मात्र कारागृहात चांगली वर्तवणूक करणाऱ्या व स्वत:मध्ये बदल केलेल्या बंदीची 26 जानेवारी व 15 ऑगस्ट दिवशी सुटका करण्याचे उपक्रम हाती घेतलेला आहे.

केंद्र सरकारच्या याउपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील तब्बल 189 बंदी जवानांची सुटका होणार आहे. त्याबाबतची कार्यवाही पुर्ण झाली असून, येत्या 26 जानेवारी रोजी बंदींना सोडण्यात येणार असल्याचे विशेष पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट 2022 रोजी राज्यातील 203 बंदी जवानांना सोडण्यात आले होते. उपक्रमामुळे बंदी जवानांना एक चांगले जिवन जगण्याची संधी मिळाली आहे.

राज्यातील विविध कारागृहात जवळपास 44 हजार बंदींची संख्या आहे. त्यात शिक्षा झालेल्या व गुन्ह्यात अटक केलेल्यांचा समावेश आहे. दरम्यान, या उपक्रमांअतर्गत गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेल्या बंदींना या विशेष माफीत समावेश नसल्याचे सांगण्यात आले आहे.

या कारागृहांमधून बंद्यांची सुटका...
पैठण खुले कारागृह- 4
ठाणे मध्यवर्ती कारागृह- 11
औरंगाबाद खुले कारागृह- 13
मुंबई मध्यवर्ती कारागृह- 4
सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह- 4
तळोजा मध्यवर्ती कारागृह- 15
नागपूर मध्यवर्ती- 41
येरवडा मध्यवर्ती- 22
येरवडा खुले कारागृह- 1
येरवडा महिला कारागृह- 2
कोल्हापूर मध्यवर्ती- 9
अमरावती मध्यवर्ती- 13
नाशिक मध्यवर्ती- 35
वाशिम जिल्हा कारागृह- 1
वर्धा जिल्हा कारागृह- 2
कोल्हापूर जिल्हा कारागृह- 2
यवतमाळ जिल्हा- 1
चंद्रपूर जिल्हा कारागृह- 2
भंडारा जिल्हा कारागृह- 3
अकोला जिल्हा कारागृह- 3

Hadapasar News : हडपसरमध्ये मध्यरात्री रंगला चोर पोलिसांचा खेळ; पाठलाग करून पोलिसांनी चोरट्याला पकडले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.