Maharashtra : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता राज्यात 1 लाख 2 हजार 434 जागांवर होणार आर टी ई चे प्रवेश

एमपीसी न्यूज –  शासनाने आरटीई कायद्यात केलेल्या बदलास मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम (Maharashtra) स्थगिती दिल्यानंतर शिक्षण विभागाने आरटीई ची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ववत केली आहे. शैक्षणिक वर्ष 2024- 25 या शैक्षणिक वर्षात राज्यातील 9 हजार 138 खासगी शाळांमधील 1 लाख 2 हजार 434 जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

आरटीई संकेतस्थळावर जाहीर केलेल्या जिल्हानिहाय सुधारित शाळांची संख्या आणि प्रवेश क्षमतेनुसार  असल्याचे स्पष्ट झाले असून आता प्रवेश प्रक्रियेत नव्याने अर्ज करण्यासाठी वेळापत्रक जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

Talegaon Dabhade : मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलचा 100 टक्के निकाल

न्यायालयाने राज्य शासनाच्या 9 फेब्रुवारी 2024 च्या अधिसूचनेला स्थगिती दिली. त्यामुळे जुन्याच पद्धतीने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले. शिक्षण विभागाने बदललेल्या नियमानुसार प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यावर राज्यातील 76 हजार 53 शासकीय शाळांतील 8 लाख 86 हजार 411 जागांसाठी केवळ 69 हजार 361 अर्ज दाखल झाले होते.

शैक्षणिक वर्ष 2024- 25 या शैक्षणिक वर्षात राज्यातील 9 हजार 138 खासगी शाळांमधील 1 लाख 2 हजार 434 जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार दिसून येत आहे. या शाळांमध्ये इंग्रजी शाळांचा ही समावेश असल्याने आता पालकांचा प्रतिसाद वाढण्याची शक्यता (Maharashtra) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.