Maharashtra : पर्यटन विभागानंतर आता शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातूनही लाखो रुपयांची चोरी

एमपीसी न्यूज – राज्याच्या पर्यटन विभागाच्या खात्यातून 67 लाख चोरीला (Maharashtra) गेल्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून देखील 47 लाख रुपये चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. शालेय  शिक्षण विभागाचे बनावट शिक्के, धनादेश आणि स्वाक्षरी करून चार टप्प्यात 47 लाख 60 हजार रुपये काढून घेतल्याबाबत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या बँक खात्यातून 47 लाख 60 हजार रुपये नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. ही सर्व खाती कोलकाता येथील आहेत.

Chikhali : लहान मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मोठ्यांमध्ये जुंपली, कोयता, लाठी-काठीने मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल 

एका महिन्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी पर्यटन विभागाच्या बँक खात्यातून 67 लाख रुपये चोरीला गेले होते. त्यानंतर अवघ्या महिनाभरात हा दुसरा प्रकार उघडकीस आला आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना हा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 419, 420, 465, 467, 471, 473, 34 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून हे चौघेजण कोण आहेत, त्यांच्या खात्यात रक्कम पाठवणारे नेमके कोण आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली (Maharashtra) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.