Maharashtra : बाळासाहेब थोरात यांनी दिला विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा

एमपीसी न्यूज : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Maharashtra) यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये मोठा कलह निर्माण झाल्याचे समोर येत आहे. 

नाशिक पदवीधर निकालामुळे नाराजी व्यक्त करताना त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. आता केंद्र यावर काय भूमिका घेणार? याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच केंद्रातील नेतृत्व थोरात यांची मनधरणी करत असल्याचे सांगितले जात आहे.

Pune News : विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; पालकमंत्री यांचा पुढाकार

थोरात यांनी राजीनाम्याच्या पत्रात आपण काँग्रेसच्याच (Maharashtra) विचारांनी पुढे जाणार असल्याचेही स्पष्ट केल्याने ते पक्षाबाहेर जाणार नसल्याचेही त्यांनी संकेत दिले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.