Maharashtra Budget 2021 : महाराष्ट्रात दारुच्या किमती वाढणार; मद्यावरील मूल्यवर्धित करामध्ये वाढ

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात दारुच्या किंमती वाढणार आहेत. राज्य सरकारने मद्यावरील मूल्यवर्धित करामध्ये वाढ केली असल्याने दारूच्या किंमती वाढणार आहेत. राज्य सरकारने मद्यावरील व्हॅटमध्ये 60 वरुन 65 टक्के वाढ केली आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा दुसरा अर्थसंकल्प जाहीर केला. पवार यांनी अर्थसंकल्पाच्या दुस-या भागात देशी बनावटीच्या मद्याच्या उत्पादन शुल्कात निर्मिती मूल्याच्या 220 टक्के किंवा 187 रुपये राहणार असल्याचे सांगितले. सर्व प्रकारच्या मद्यावरील व्ह्रॅटचा दर 35 वरुन 40 टक्के केला आहे.

महिलेच्या नावावर घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात 1 टक्का सवलत दिली जाणार. यामुळे एक हजार कोटी रूपयांची तूट निर्माण होणार असल्याचे पवार यांनी नमूद केलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.