Maharashtra Budget 2021 : राज्यातील प्राचीन मंदिरे जतन करणार, 101 कोटींची तरतूद

एमपीसी न्यूज – राज्यातील प्राचीन मंदिरे जतन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. या मार्फत आठ मंदिरांची निवड करण्यात आली आहे, त्यासाठी 101 कोटी रुपयांची तरतूद कतरण्यात आली आहे.

महाराष्ट्रासाठी नवे पर्यटन धोरण ठरवण्यात आले आहे, त्यासाठी 1367 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नवे पर्यटन धोरण लवकरच जाहीर होणार असल्याचे अजित पवार म्हणाले. वरळीच्या डेअरीच्या जागेवर पर्यटन केंद्र उभारण्याचे काम लवकरच सुरु केलं जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य संग्रहालय उभारलं जाणार असून, सांस्कृतिक कार्य विभागासाठी 121 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अष्टविनायक क्षेत्रासाठी देखील निधी उपलब्ध केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.