Maharashtra Budget 2023 : राज्याच्या अर्थसंकल्पासाठी मत मांडण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

एमपीसी न्यूज : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या (Maharashtra Budget 2023) इतिहासात प्रथमच राज्याचे अर्थमंत्री म्हणून 2023 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याच भूमिकेतून या अर्थसंकल्पासाठी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेकडून काही अभिनव संकल्पना आमंत्रित केल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेला अर्थसंकल्प कसा हवा, हे देवेंद्र फडणवीस जाणून घेणार आहेत. त्यासाठी त्यांनी एक ऑनलाइन लिंक सादर केली आहे. 

Bye-Election : कसबा पोटनिवडणुकीसाठी आज एकूण 17 उमेदवारांनी घेतले नामनिर्देशन पत्र

या अर्थसंकल्पात तुम्हाला काय हवे आणि तुमच्या नाविन्यपूर्ण संकल्पना कोणत्या? याबाबतीत सूचना (Maharashtra Budget 2023) bit.ly/MahaBudget23 या लिंकवर देण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले आहे. सातत्याने जनतेत राहणे आणि जनतेच्या मतांना सर्वोच्च प्राधान्य देणे, हे त्यांचे वैशिष्ट्य असल्याने ही अनोखी कल्पना राबवत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात अपेक्षा असतील त्यांनी वरील लिंकवर मत मांडायचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.