Uddhav Thackeray : राज्याचा अर्थसंकल्प गाजर हलवा, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. त्यामध्ये राज्याच्या नागरिकांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या. (Uddhav Thackeray) मात्र, विरोधकांनी शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पावर जोरदार टीकास्त्र सोडलं. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा खरपूस समाचार घेतला. शिंदे सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा,असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर बोचरी टीका केली आहे.

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सादर केला. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या महिला व शेतकऱ्यांसाठी देखील मोठ्या घोषणा केल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील प्रसार माध्यमांशी संवाद साधून सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली.

‘आम्ही ज्या योजना घोषणा केल्या. त्याच बदलून जाहीर केल्या आहेत. मुंबई बाळासाहेब दवाखाना ही आमची योजना राज्यभर राबविण्यात येणार आहे. (Uddhav Thackeray) सर्व घटकांना मधाचा बोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच हा अर्थसंकल्पाबद्दल एका वाक्यात सांगायंचं झालं तर हा अर्थसंकल्प केवळ गाजरचा हलवा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला; अजित पवारांची टीका

शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पावरून राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, विरोधी पक्षनते अजित पवार यांनी जोरदार टीका केली. अजित पवार म्हणाले, ‘चुनावी जुमला असा हा अर्थसंकल्प आहे. शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा, पण स्मारकाच्या बाबतीत साधा उल्लेखही नाही.

‘मागील अर्थसंकल्पात आम्ही पंचसूत्री मंडली होती. विकासाचं अमृत – जे कधी दिसणार नाही. जनतेला स्वप्नांच्या दुनियेत फिरून आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. (Uddhav Thackeray) किती निधी देणार, याचा ठोस आकडा नाही. बऱ्याच बाबी मागच्या अर्थसंक्लपातील आहेत’, अशीही टीका अजित पवार यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.