Maharashtra Budget : 9 मार्चला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प; फडणवीसांची परिक्षा!

एमपीसी न्यूज : शिंदे – फडणवीस युतीच्या काळातले (Maharashtra Budget) महाराष्ट्राचे पहिले विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान पूर्ण होणार आहे. यासोबतच 8 मार्च रोजी आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार असून 9 मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. 

शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) सत्तेत आल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत.

फडणवीस यांनी आमदारकीच्या काळात अर्थसंकल्प कसा असावा? यावर पुस्तक देखील लिहिले होते. यासोबतच त्यांनी लोकांकडून सूचना देखील मागवल्या आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प पाहणे फार महत्त्वाचे ठरले आहे.

Pune Crime : आई-वडिलांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी; मुलगा आणि सुनेविरोधात गुन्हा

एकार्थी यंदा देवेंद्र फडणवीस यांची परिक्षा आहे. कारण फडणवीसांच्या पुढाकाराने झालेले सरकार, अर्थमंत्री म्हणून मांडण्यात येणारा अर्थसंकल्प यामुळे विरोधकांच्या सर्व प्रश्नांना फडणवीस कसे सामोरे (Maharashtra Budget) जातील याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.