Maharashtra Cabinet Expansion : विवादित संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांची देखील मंत्रिपदासाठी वर्णी!

एमपीसी न्यूज : अखेर 40 दिवसांनंतर शिंदे-फडणवीस (Maharashtra Cabinet Expansion) सरकारला आज मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला आहे. आज सकाळी 11 वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नवीन मंत्र्यांना राजभवनात शपथ देणार आहेत. भाजप आणि शिंदे गटाच्या वतीने 9-9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये पुढील नेत्यांचा समावेश आहे.

मंगलप्रभात लोढा,
चंद्रकांत पाटील,
आशिष शेलार,
विजयकुमार गावित,
सुधीर मुनगंटीवार,
गिरीश महाजन,
रवींद्र चव्हाण,
राधाकृष्ण विखे पाटील,
सुरेश खाडे,
अतुल सावे,
गणेश नाईक,
शंभूराज देसाई,
संजय राठोड,
अब्दुल सत्तार,
संदीपान भुमरे,
उदय सामंत,
तानाजी सावंत,
रवींद्र चव्हाण,
दीपक केसरकर

यामध्ये विवादित असे शिवसेनेचे संजय राठोड आणि TET घोटाळ्यात नाव आलेले अब्दुल सत्तार यांना देखील शिंदे सरकारमध्ये समावेश करून घेण्यात आले आहे. यामध्ये भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा पहिल्यांदाच मंत्री होणार आहेत.

Lavasa Hill Station : लवासा हिल स्टेशन बेकायदा? शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना नोटीस

17 ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन – Maharashtra Cabinet Expansion

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ते 23 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या सात दिवसीय अधिवेशनात शनिवार आणि रविवार सुट्टी असेल. कामकाजाचे दिवस पाच दिवस असतील. यापूर्वी पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार होते, परंतु उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर ते पुढे ढकलण्यात आले. पावसाळी अधिवेशन बोलवण्यासंदर्भात मंगळवारी विधानभवनात विधिमंडळ कामकाज समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत अधिवेशनाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.