Maharashtra : दिल्लीत महाराष्ट्राच्या चित्ररथाला द्वितीय क्रमांक; लोककला आणि नारी शक्तीचा सन्मान

एमपीसी न्यूज : प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावरील (Maharashtra) परेडमधील सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने यंदा दुसरा क्रमांक पटकावला आहे. साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्तीचा सन्मान करणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने बाजी मारली आहे, तर पहिला क्रमांक उत्तराखंडच्या चित्ररथाला मिळाला आहे. तर तिसरा क्रमांक उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला मिळाला आहे.

यंदा 17 राज्यांनी चित्ररथ सादर केला. त्यामध्ये महाराष्ट्राने ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ या विषयावर  चित्ररथ सादर केला.

Pimple Saudagar : न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये ‘महात्मा गांधी’ पुण्यतिथी साजरी

संबळ वाजवणाऱ्या गोंधळींचे भव्य चित्र होते. तर त्या पाठी साडेतीन शक्तीपीठं म्हणजेच, कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तीपीठांचा देखावा दाखवण्यात (Maharashtra) आला होता. ही सगळी शक्तीपीठं म्हणजे नारी शक्तीचे रूप आहेत. एवढेच नसून महाराष्ट्राची लोककलेचा सन्मान म्हणून गोंधळी आणि पोतराजसुद्धा चित्ररथामध्ये साकारण्यात आले होते. महाराष्ट्राला मिळालेला हा दूसरा क्रमांक स्त्री आणि महाराष्ट्राच्या लोककलेचा एकार्थी सन्मानच ठरला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.