Pune : महाराष्ट्र क्लोज्ड् स्न्वॅश अजिंक्यपद स्पर्धा; अर्णव सरीन, रौनक सिंग, अलिना शहा, सानिका चौधरी यांना विजेतेपद !

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र स्न्वॅश रॅकेटस् असोसिएशन (एमएसआरए) तर्फे आयोजित महाराष्ट्र क्लोज्ड् स्न्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अर्णव सरीन, रौनक सिंग तसेच अलिना शहा व सानिका चौधरी यांनी आपापल्या गटाचे विजेतेपद मिळवले. आयस्न्वॅश अ‍ॅकॅडमी, मुंढवा येथे झालेल्या या स्पर्धेच्या पुरूष गटाच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित अभिनव सिन्हा याने सातव्या मानांकित सिमरनजीत सिंग याचा ११-४, ११-३, ११-२ असा पराभव केला. महिला गटाच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित सानिका चौधरीने दुसर्‍या मानांकित निकीता अगरवाल हिचा ११-३, ११-१, ११-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

१९ वर्षाखालील गटात अर्णव सरीन याने मुलांच्या तर, अवनी नगर हिने मुलींच्या गटाचे विजेतेपद मिळवले. १७ वर्षाखालील गटात रौनक सिंग याने मुलांच्या तर, तनिष्का जैन हिने मुलींच्या गटाचे विजेतेपद मिळवले.

१५ वर्षाखालील गटात पार्थ अंबानी याने मुलांच्या तर, सोनया बजाज हिने मुलींच्या गटाचे विजेतेपद मिळवले.

१३ वर्षाखालील गटात काव्य आनंद याने मुलांच्या तर, तिशा जसानी हिने मुलींच्या गटाचे विजेतेपद मिळवले.

११ वर्षाखालील गटात इशान दाबके याने मुलांच्या तर, एलिना शहा हिने मुलींच्या गटाचे विजेतेपद संपादन केले.स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र राज्य अन्न आयोगचे अध्यक्ष अरूण देशपांडे, महाराष्ट्र ऑलंपिक संघटनेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. लेजंडस् स्पोर्टस् क्लबचे संचालक संदीप कोद्रे, महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटनेचे सरचिटणीस डॉ. ए. ध्यानचंद कुमार, जिल्हा क्रिडा अधिकारी विजय संतान, डॉ. प्रदीप खांडरे, पीएसआरएचे सरचिटणीस आनंद लाहोटी आणि पीएसआरए अध्यक्ष कालिदास मगर यांच्या उपस्थित करण्यात आला.

स्पर्धेचा निकालः पुरूषः उपांत्य फेरीः अभिनव सिन्हा (१) वि.वि. संकेत पाटील (६) ११-०, ११-१, ११-५; सिमरनजीत सिंग (७) वि.वि. खोमनसिंग भाटी ६-११, १४-१२, ११-९, ११-७;अंतिमः अभिनव सिन्हा वि.वि. सिमरनजीत सिंग ११-४, ११-३, ११-२;

१९ वर्षाखालील मुलेः उपांत्यः अर्णव सरीन वि.वि. आर्ष मेहता ११-३, ११-४, ११-४; अव्देत आदीक (२) वि.वि. अर्जुन सिंग ११-५, ११-३, ११-३; अंतिमः अर्णव सरीन वि.वि. अव्देत आदिक (२) ८-११, ११-५, ११-८, ११-४;१७ वर्षाखालील मुलेः उपांत्यः रौनक सिंग (८) वि.वि. ऋत्व सामंत १५-१३, ११-७, ११-७; मोहीत भट (१) वि.वि. जेह पंडोळ ११-६, ६-११, ११-२, ८-११, ११-५;अंतिमः रौनक सिंग (८) वि.वि. मोहीत भट (१) १२-१०, १२-१४, ११-९, ११-१;

१५ वर्षाखालील मुलेः उपांत्यः पार्थ अंबानी (१) वि.वि. करण पटेल (३) ११-६, ११-८, ११-४; युवराज वाधवानी (२) वि.वि. शरण पंजाबी ११-६, ११-४, ११-२;अंतिमः पार्थ अंबानी (१) वि.वि. युवराज वाधवानी (२) ११-४, ११-५, १५-१३;१३ वर्षाखालील मुलेः उपांत्यः वेदांत चेड्डा (८) वि.वि. धु्रव खन्ना (१) १२-१०, ११-९, ११-२; काव्या आनंद (३) वि.वि. इशांत उप्पल ११-८, ११-५, ११-८;अंतिमः काव्य आनंद (३) वि.वि. वेदांत चेड्डा (८) ११-४, ६-११, ११-६, ११-८;

११ वर्षाखालील मुलेः इशान दाबके (१) वि.वि. हृधन शहा (३) ११-६, ११-७, ११-८; कवनपाल सगि कोहली (४) वि.वि. पुरव रामभिया (२) ११-७, ५-११, १०-१२, ११-८, ११-६;अंतिमः इशान दाबके (१) वि.वि. कवनपाल सिंग (४) ११-५, ११-६, ११-५;महिला गटः उपांत्यः सानिका चौधरी (१) वि.वि. रौनक बेग ११-०, ११-०, ११-२; निकीता अगरवाल (२) वि.वि. अमृता स्वामी ११-४, ११-१, ११-१; अंतिमः सानिका चौधरी (१) वि.वि. निकीता अगरवाल (२) ११-३, ११-१, ११-१;

१९ वर्षाखालील गटः राऊंड रॉबिनः अवनी नगर वि.वि. संस्कृती उमक ११-४, ११-०, ११-४; रेवा बम्हा वि.वि. राधिका चुते ११-१, ११-१, ११-०; संस्कृती उमक पुढे चाल वि. श्रेया कोल्हे; अवनी नगर वि.वि. राधिका चुते ११-१, ११-४, ११-२; राधिका चुते पुढे चाल वि. श्रेया कोल्हे; अवनी नगर वि.वि. रेवा ब्रम्हा ११-१, ११-२, ११-१;

१७ वर्षाखालील गटः राऊंड रॉबिनः सराह वैथेकर वि.वि. जानव्ही भुजाडे ११-०, ११-०, ११-१; तनिष्क जैन वि.वि. आर्या ढगे ११-१, ११-५, ११-४; तनिष्का जैन वि.वि. जानव्ही भुजगडे ११-१, ११-५, ११-४; सारह वैठेकर वि.वि. आर्या ढगे ११-०, ११-०, ११-१; जानव्ही भुजडे वि.वि. आर्या ढगे ११-२, ११-४, ११-१;अंतिमः तनिष्का जैन वि.वि. सराह वैुहेर ११-५, ११-४, ११-८;

१५ वर्षाखालील गटः उपांत्यः सोनया बजाज (१) वि.वि. खुशी जसपाल (६) ११-२, ११-२, ११-९; आर्या बेलसरे (३) वि.वि. साईश गुप्ता (२) १२-१४, ९-११, ११-८, ११-७, ११-९; अंतिमः सोनया बजाज (१) वि.वि. आर्या बेलसरे (३) ११-६, ११-७, ७-११, ११-७;

१३ वर्षाखालील गटः करीना फिप्स् (३) वि.वि. प्रतिक्षा भट ११-१, ११-३, ११-२; तिशा जसानी (२) वि.वि. निया जैन (४) ११-२, ११-१, ११-०; अंतिमः तिशा जसानी (२) वि.वि. करीना फिप्स् (३) ११-७, ११-६, ३-११, ११-७;

११ वर्षाखालील गटः उपांत्यः एलिना शहा (१) वि.वि. अनिका दुबे (३) ११-८, ८-११, ११-४,११-६; व्ह्योमिका खंडेलवाल (२) वि.वि. दिवा शहा (४) ४-११, १५-१३, ११-९, ११-५;अंतिमः एलिना शहा (१) वि.वि. व्ह्योमिका खंडेलवाल (२) ११-४, १८-१६, ११-२;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.