Maharashtra Corona Update : राज्यात आज 34,424 नवे कोरोना रुग्ण, 22 मृत्यू

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (मंगळवारी) 34 हजार 424 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 69 लाख 87 हजार 938 एवढी झाली आहे. त्यापैकी 66 लाख 21 हजार 070 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 18 हजार 967 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 94.75 टक्के एवढा झाला आहे.

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. सध्या 2 लाख 21 हजार 477 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजवर 1 लाख 41 हजार 669 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.05 टक्के एवढा आहे.

राज्यात आजवर 7 कोटी 09 लाख 28 हजार 954 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या 14 लाख 64 हजार 987 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3,032 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.