Maharashtra Corona Update : दिलासादायक ! राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 25 हजारांच्या खाली

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या कमी झाली असून, आज (शुक्रवारी) 1 हजार 632 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 25 हजारांच्या खाली आली आहे.

आरोग्य विभागाच्य़ा आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 65 लाख 99 हजार 850 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 32 हजार 138 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. आज 1 हजार 744 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.46 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आज 40 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 39 हजार 965 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

राज्यात आतापर्यंत 6 कोटी 16 लाख 26 हजार 299 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 998 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 1 लाख 98 हजार 958 जण होम क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.