Maharashtra Corona Update : राज्यात आज 1,003 नवे कोरोना रुग्ण, 1,052 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (बुधवारी) 1,003 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 1,052 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील 64 लाख 70 हजार 791 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.64 टक्के झाला आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 66 लाख 26 हजार 875 एवढी झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यात 11 हजार 766 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात आज राज्यात 32 रुग्ण दगावले असून, आजवर 1 लाख 40 हजार 668 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 6 कोटी 42 लाख 67 हजार 953 नमूने तपासण्यात आले आहेत.

सध्या राज्यात 1 हजार 056 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 1 लाख 557 जण होम क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.