Maharashtra Corona Update : राज्यात आज 678 नवे कोरोना रुग्ण, 942 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – राज्यात आज (मंगळवारी) 678 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 942 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाली असून, सध्या 7 हजार 555 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाख 35 हजार 658 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 83 हजार 435 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.71 टक्के एवढा आहे.

राज्यात आज 35 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजवर 1 लाख 40 हजार 997 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.

सध्या राज्यात 83 हजार 421 रुग्ण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 963 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 55 लाख 11 हजार 394 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.