Maharashtra Corona Update : 11 दिवसांत 75 हजार कोरोना रुग्णांची नोंद, आज 18,466 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग हात पाय पसरू लागला आहे. राज्यात आज (मंगळवारी) 18 हजार 466 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दिवसभरात 75 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत.चिंताजनक बाब म्हणजे मागील 11 दिवसांत राज्यात 75 हजार 739 रुग्णांची नोंद झाली आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 67 लाख 30 हजार 494 एवढी झाली आहे. त्यापैकी 65 लाख 18 हजार 916 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 4,558 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 96.86 टक्के एवढा झाला आहे.

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पुन्हा वाढली असून, सध्या 66 हजार 308 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 41 हजार 573 जणांचा मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.11 टक्के एवढा आहे.

राज्यात सध्या 3 लाख 98 हजार 391 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 1,110 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 653 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 259 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.